Sharad Pawar Full PC : माझे फोटो वापरणाऱ्यांविरोधात कोर्टात जाणार, अजित पवार गटाला इशारा

Continues below advertisement

मी पुन्हा येईन... असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून व्यक्त केला होता. यावरुन आता शरद पवारांनी टीकास्त्र सोडलेय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले तर मुंबईमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीबाबतही माहिती दिली. मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, 'देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही, त्यामुळं मी पुन्हा येईल असे कितीही सांगितलं तरी त्यांची अवस्था देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी होईल.'

मणिपूरजवळ चीन आहे, त्यामुळं अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घडणाऱ्या सर्व गोष्टी देशाच्या दृष्टीने घातक आहेत, 90 दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. अविश्वास ठरावाच्या दिवशी मणिपूरवर 2 मिनिटे बोलले आणि इतर विषयावर 2 तास बोलले. प्रधानमंत्र्यांनी मणिपूर0मध्ये जावे लोकांना विश्वास द्यावा, हे त्यांना महत्वाचे वाटलं नाही.  त्यापेक्षा निवडणुकांच्या तयारीची मीटिंग घेणं त्यांना महत्वाची वाटली. मणिपूरमध्येस्त्रियांची धिंड काढली जाते आणि मोदी सरकार पाहतेय, म्हणून जनमत मोदी सरकार विरोधात करायची इंडियाची भूमिका आहे. दिल्ली भाषणात त्यांनी या सगळ्यांचा उल्लेख करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा येईल म्हणाले. आता फडणवीस आले मात्र कसे ? ते बघितले त्यामुळं आता हे पुन्हा कसे येतील बघावे लागेल. असो, आम्ही संघर्ष करू आणि माजबुतीने उभे राहू. जनमत तयार करून यांना धडा शिकवू, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram