Zero Hour : Supriya Sule यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी पवार कुटुंब एकवटलं, दादा एकटे पडलेत?
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात सकाळी साडे नऊ वाजता प्रचाराचा असून शुभारंभ होणार आहे. त्यांना नंतर जाहीर सभा होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत. शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आज सुप्रिया सुळे यांचा तर उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.