Sharad Pawar interview : Uddhav Thackeray यांचा राजीनामा ते JPC, शरद पवार यांची मुलाखत
Sharad Pawar interview : Uddhav Thackeray यांचा राजीनामा ते JPC, शरद पवार यांची मुलाखत
Sharad Pawar EXCLUSIVE: संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भाजपला (BJP) पूरक अशी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करण्यात येतो. तर, दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे शरद पवार यांचे कौतुक करतात. एबीपी माझा दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी यावर मनमोकळेपणाने भाष्य केले,
शरद पवार यांनी म्हटले की, एखाद वेळेस आम्ही सभागृहात वेगळी भूमिका घेतली असेल, हे मान्य आहे. काही बाबतीत मतभिन्नता असू शकेल. याचा अर्थ मतभेद नव्हे. मत मांडण्याचे, व्यक्त करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तो सभागृहात व्यक्तदेखील केला जातो. विरोधकांना एकत्र ठेवण्यासाठी विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी सभागृहातून सभा त्याग करणे हे पाऊल चांगले आहे असे पवार यांनी म्हटले. अनेक मुद्यांवर अनेकांची मते, भूमिका वेगवेगळी असतात याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या संसदीय राजकारणात मला 54 वर्ष झाले. देशात एवढी वर्ष काम केलेला दुसरा नेता नाही. इतकी वर्ष संसद-विधीमंडळात काम केल्यानंतर काही प्रमाणात आम्हालादेखील अनुभव असेल. माझा दृष्टीकोण असा आहे की, सत्ताधारी-विरोधी पक्षाचा नेता, पंतप्रधान या एक संस्था आहेत. त्यांच्यावर धोरणाच्या अनुषंगाने टीका व्हावी, त्यांच्यावर वैयक्तिक टीका होता कामा नये असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.