Vote Jihad: 'मंत्र्याने जातीयवादावर बोलणे हिताचे नाही', Sharad Pawar यांचा Ashish Shelar यांना टोला
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते व मंत्री आशिष शेलार यांच्यात 'दुबार मतदार' यादीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'एक मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचं नाही,' अशा शब्दांत शरद पवार यांनी आशिष शेलार यांच्यावर, नाव न घेता, टीका केली आहे. काल एका पत्रकार परिषदेत, आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेवर (MNS) निशाणा साधला होता. MVA आणि मनसे केवळ हिंदू आणि मराठी दुबार मतदारांबद्दल बोलत असून, मुस्लिम दुबार मतदारांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला, याला त्यांनी 'व्होट जिहाद' म्हटले. अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम दुबार मतदारांमुळेच MVA चे उमेदवार जिंकल्याचा दावाही शेलार यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement