NCP Meeting | सचिन वाझेप्रकरणी शरद पवार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार, राष्ट्रवादीची दुपारी बैठक

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महत्वाचं अपडेट हाती आलं आहे. वारंवार गाडीची नंबरप्लेट बदलल्याचं सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आलं आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार यातूनच सचिन वाझेंच्या अटकेमागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे. एनआयएला सीसीटीव्ही फुटेजमधून काही माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे सचिन वाझे संशयाच्या घेऱ्यात सापडले आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. एबीपी न्यूजच्या हाती लागलेल्या Exclusive सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, संशयाच्या घेऱ्यात असलेल्या नंबर प्लेटची इनोव्हा कार दोन वेळा मुंबई पोलिस कमिशनर ऑफिसमधून निघाली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola