NCP Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं कसली कंबर, बैठका घेण्यास सुरुवात
abp majha web team
Updated at:
30 May 2023 10:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये.. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केलीये..
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आद परभणी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे... आज सकाळी १० वाजता मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे.. या बैठकीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित असणार आहेत.. तर उद्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे..