Yavat Communal Tension | Sharad Pawar यांचा CM Fadnavis यांना फोन, शांततेसाठी पुढाकार
यवत येथे घडलेल्या घटनेनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. घडलेल्या घटना-हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा अशीही मागणी त्यांनी केली. यवत येथील तणाव संवेदनशीलपणे हाताळला जावा अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. फोनवरील संवादात त्यांनी "सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा. यासोबतच सामाजिक सलोखा जपला जावा राज्यामध्ये" असे आवाहन केले. यवत येथील प्रकरण संवेदनशीलपणे हाताळावे असेही त्यांनी सांगितले.