Jay Pawar News : अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार

Jay Pawar News : अजित पवारांच्या मुलाच्या साखरपुड्याला शरद पवारही उपस्थित राहणार

 उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा आज पुण्यात (10 एप्रिल) साखरपुडा पार पडतोय. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय अजित पवार यांचा आज साखरपुडा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे. जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्या सोबत होणार आहे. या सोहळ्यासाठी मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती समोर येत आहे. 

जय पवार आणि ऋतुजा पाटीलने घेतली होती शरद पवारांची भेट-

साखरपुडा होण्याआधी जय पवार आणि ऋतुजा पाटीलसह मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी 13 मार्चला शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचीदेखील भेट घेतली. पवार कुटुंबियांच्या या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola