Shambhuraj Desai : येत्या वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार : शंभूराज देसाई
abp majha web team
Updated at:
25 Aug 2022 08:42 AM (IST)
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी.... येत्या 'वर्षभरात ७५ हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार' असल्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केलेय. एमपीएससीतर्फे आकृतीबंधानुसार ही पदं भरण्यात येतील. तसंच जिल्हा निवड समित्यांमार्फत भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ५० टक्के पदंही भरण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय. यासोबतच मराठा समाजातल्या तरुणांसाठीही महत्वाचा निर्मय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय... मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल गटात आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे.. तसंच भरती प्रक्रियेत अनियमितता केलेल्या खासगी कंपव्यांचा या प्रक्रियेत समावेश होणार नसल्याचंही शंभूराज देसाई यांनी सांगितंलय.