Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती
Shambhuraj Desai Call Manoj Jarange : शंभुराज देसाईंची जरांगेंना फोन करुन उपचार घेण्याची विनंती
जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्याविषयी आमची कार्यवाही सुरू आहे. विनंती करू नाही त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे मात्र आंदोलन सोडण्याविषयी आमचे प्रयत्न सुरू आहेत -- शंभूराज देसाई उपोषण सुरू होण्याआधीच मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता उपोषणाचा मार्ग अवलंबू नका असं सांगितलं होते त्यांच्या काय मागण्या आहेत याविषयी आमचा पाठपुरावा सुरू आहे. हैदराबाद गव्हर्मेंट कडून सर्टिफाय कॉपीज मागितलेल्या आहेत. सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावेत याविषयी देखील जे गुन्हे मागे घेण्यासारखे आहेत. त्याबाबतचे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडून सरकारकडे आलेले आहेत.विधी आणि न्याय विभागाचा अंतिम अभिप्राय येणे बाकी आहे मुख्यमंत्र्यांचे या विषयावर बारकाईने लक्ष आहे. ज्याप्रमाणे आश्वासन दिले आहेत त्या पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. जरांगे पाटील यांना उपोषणाला बसू नका असं सांगितलं होतं मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. जरांगे पाटिल यांनी सरकारच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा मराठा आरक्षणाबाबत कोणतीही पूर्तता अपूर्ण राहू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत बच्चू कडू पाटील यांनी केंद्रातून दहा टक्के आरक्षण वाढीव मिळाले तर हा प्रश्न मिटेल असे म्हणतात मात्र जे मागील काही दिवसात आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी हे सर्व प्रश्न आहेत हे बोलण्याची गरज होती. मात्र असं झालं नाही. याविषयी बच्चू कडू यांचे जे म्हणणं आहे याविषयी आम्ही सविस्तर चर्चा करू. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत आम्ही महायुती म्हणून त्यांना सामोरे जात आहोत. आणि महायुती म्हणूनच आम्ही या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो मार्गी लावणार आहोत राहुल गांधी यांचे जीभ छाटणार त्याला अकरा लाखाचे बक्षीस या संजय गायकवाड यांच्या विधानाबाबत कोणही समर्थन करणार नाही. कोणालाही इजा पोहोचेल असे असे राजकीय वक्तव्य याचं कोणीही समर्थन करणार नाही.