Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; कोल्हापुरातील शेतकऱ्यांची मागणी

Continues below advertisement

Shaktipeeth Expressway Protest :  शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; कोल्हापुरातील शेतकऱ्यांची मागणी

6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 सहा तालुक्यातील शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहे. भुदरगड तालुक्यातील 21, आजरा तालुक्यातील 5, शिरोळ तालुक्यातील 5, हातकणंगले तालुक्यातील 5 करवीर तालुक्यातील 10 व कागल तालुक्यातील 13 गावातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. 

हजारे हेक्टर क्षेत्र या महामार्गामध्ये संपादित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. या शेतकऱ्यांच्या अल्प प्रमाणात असणाऱ्या जमिनी शक्तिपीठ महामार्गामध्ये गेल्यास शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी जमिन शिल्लक रहाणार नाही, त्यामुळे शेकऱ्यांमध्ये या शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध दर्शविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेता हा महामार्ग तत्काळ रद्द करणे गरजेचं असल्याचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी म्हटले आहे. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांना देण्यात आल्याची माहिती दिली. 

या महामार्गात बाधित होणारी गावे कोणती आहेत?

  • शिरोळ तालुका - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
  • हातकणंगले तालुका - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, 
  • करवीर तालुका - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे 
  • कागल तालुका - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
  • भुदरगड तालुका - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
  • आजरा तालुका - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram