Shakti Act : शक्ती विधेयक विधान परिषदेत मंजूर, महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने मंजुरी

Continues below advertisement

Maharashtra Shakti Act : शक्ती कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज विधानसभेत दिली. राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर आता राज्यात हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्य विधिमंडळात शक्ती कायदा एकमतानं मंजूर करण्यात आला होता.  दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवलं होतं. आता या कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram