Shailesh Gavai : अमरावती वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी

Continues below advertisement

Shailesh Gavai : अमरावती वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांची बंडखोरी  अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाविरोधात बंडखोरी केलीय. वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पक्षादेश धुडकावत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. समाजाचा आणि कार्यकर्त्यांचा वाढता दबाव असल्याने पक्षाविरोधात निर्णय घेतला असल्याची माहिती शैलेश गवई यांनी दिली आहे. वंचितकडून जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे. वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष नाराज आहेत. तसेच रिपब्लिकन सेना वंचितच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नसल्याचा आरोप गवई यांनी केला आहे. आता वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई बळवंत वानखडे यांचा प्रचार करणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram