Shahu Maharaj on Sambhaji Raje : वडील छत्रपती शाहू महाराज यांचे संभाजीराजे छत्रपती यांना खडेबोल

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती. आता त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांना खडे बोल सुनावले आहेत. छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आला असता तर विषय वेगळा असता, पण तसं काही झालेलं नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असेही शाहू महाराज यांनी म्हटले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola