Nanded | माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले, वीरपत्नीची खंत | ABP Majha
Continues below advertisement
मातृभूमीच्या रक्षणार्थ लढताना आपल्या देशाचे अनेक वीर जवान शहीद होतात. त्यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जमाव जमतो. राजकीय नेते, कार्यकर्ते सर्व येतात सांत्वन करतात, मात्र पुढे या शहिदांच्या कुटुंबाचं काय होतं, हे कुणीही पाहत नाही. नांदेड जिल्ह्यातील एका शहिदाच्या वीरपत्नीला असाच अनुभव येत आहे. याच कटू अनुभवाने आता ही वीरपत्नी उद्विग्न होऊन माझे पती विनाकारण देशासाठी शाहिद झाले, अशी त्यांची भावना झाली आहे.
Continues below advertisement