Shahajibapu Patil : आठ दिवसात केलं नऊ किलो वजन कमी, शहाजीबापू पाटील नवीन रूपात ABP Majha

Continues below advertisement

पंढरपूर:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असणारे शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) आता नवीन रूपात समोर येणार आहे.  बंगळूरू येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंतर आता नऊ किलो वजन कमी करून पुन्हा नव्या जोमाने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते. अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांचेवर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता याचे गुपित समोर आले असून 24 डिसेंबर रोजी शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळूरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी दाखल झाले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram