Shahaji Bapu Patil Full Speech : शिंदेंच्या दाढीचा केस ठाकरेंनी उचलला तर तुमच्या घरात काम करेन

Continues below advertisement

Shahaji Bapu Patil Full Speech : शिंदेंच्या दाढीचा केस ठाकरेंनी उचलला तर तुमच्या घरात काम करेन बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर या गांधी मैदानात इतकी मोठी सभा झाली नाही  शिवसेनेला साजेसे आयोजन या सभेचे केलं आहे  दीड वर्षांपूर्वी उठाव केला आणि 50 आमदार सोबत आले  बाळासाहेब नेहमी अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ करायचे  अंबाबाई देवीकडे केवळ शेतकरी सुखी होऊ दे, नागरिकांचा विकास होऊ दे असं साकडं घातलं  महापुरात मी 10 दिवस कोल्हापुरात होतो  त्यावेळी कोल्हापूरकरांमधली माणुसकी पाहिली होती  महापुरात गर्भवती महिलेला अडकली होती  NDRF मला म्हणाले रात्रीचं जाऊ शकत नाही  पण मी म्हटलं की मी थांबू शकत नाही   मी पुढे चाललो आणि इनडीआरएफचे पाठीमागून आले  मुंबईच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर सोडून जाणारे कुठं आणि इथं एकमेकांना मदत करणारे कोल्हापूरकर कुठं  बाळासाहेबांच्या विचारांनी बेईमानी करत असेल त्यांना कायमस्वरूपी घरात बसवायचं आहे  बाळासाहेब यांचे विचार सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ लागते आणि तसं वागायला लागतं  बाळासाहेब चोरायला वस्तू होते का? ते विचार होते  सर्वसामान्य घरातील मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?  तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेला व्यक्तीनेच मुख्यमंत्री व्हायचं का?  शत्रूच्या घोड्याना सुद्धा धनाजी-संताजी दिसत होते  तर हा एकनाथ शिंदे यांना उठता बसता दिसत आहे  हे सरकार सर्व घटकांसाठी आपण मदत करतो  म्हणून इतका पाठींबा पाहायला मिळतोय  उबाठा गटाने 50 कोटी मिळावे म्हणून पत्र पाठवले  एका क्षणाचाही विचार न करता देऊन टाकले  आमच्यावर 50 खोके म्हणून टीका करतात  अरे मनाची नाही तरी जनाची तरी वाटायला पाहिजे  - शहाजी बापू पाटील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram