
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी 9 किलो वजन घटवलं; पाहा कसे दिसतात शहाजी बापू पाटील
काय झाडी,काय डोंगार आन काय हाटील म्हणत शहाजी बापू फेमस झाले. मात्र आता शहाजी बापू फेमस होणारेत त्यांच्या वेट लॉसमुळे.. बापूंनी बंगळूर येथे हॅपिनेस कार्यक्रमातील पंचकर्म उपचार घेतल्यानंत त्यांनी ९ किलो वजन कमी केलंय.हे वजन कमी करण्यासाठी बापूंनी मोठे परिश्रम देखील घेतलेत.. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू पहिल्या दोन दिवसानंतर गायब झाले होते . अगदी त्यांच्या सांगोल्यात येऊन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागल्यावरही बापूंकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नव्हती .त्यामुळे बापू नेमके आहेत तरी कुठे ? अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यांनी केलेल्या वेटलॉसचे फोटो व्हायरल झालेत. आता महाराष्ट्रासमोर येताना शाररिकदृष्ट्या एकदम ओक्के झालेत.. त्यामुळे आपल्या भाषणातून कोणाला लक्ष करणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे.