Dr. Mangala Narlikar Passed Away : ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ.मंगला नारळीकरांचं निधन
गणितज्ज्ञ डॉ. मंगल नारळीकर म्हणजे पूर्वाश्रमीच्या मंगल राजवाडे. त्या एमएला मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहानं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. लग्नानंतर त्यांनी केंब्रिजमध्ये संसाराबरोबरच गणितातील अध्ययन सुरू ठेवलं. १९७२ साली भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचं काम सुरू केलं, तर मंगलताईंनी ‘संश्लेषात्मक अंक सिद्धांत’ या विषयात पीएचडी मिळवली. त्यांनी पदव्युत्तर आणि एमफिलच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचं काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘गणितगप्पा’, ‘गणिताच्या सोप्या वाटा’ यांसारखी पुस्तकं लिहिली.
Tags :
Cambridge Phd Research Books Mathematician Dr. Mangal Narlikar Mangal Rajwade Studies In Mathematics Jayantrao TIF Articles