Vilaskaka Patil Undalkar | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन झालं. साताऱ्यात वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील एक महिन्यापासून साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार घेत होते. आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात झालं. तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. विलासकाका उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांचे कट्टर विरोधक होते हे सगळ्यांच माहित होतं. पंरतु दोन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं समोर आलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola