Security Reduction of MVA Leaders : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुरक्षा हटवल्याने आरोप - प्रत्यारोप

Continues below advertisement

राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत शहकाटशहाचं राजकारण सुरु असताना शिंदे सरकारनं महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा हटवल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलीय. तर वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, भास्कर जाधव, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील आदी नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलीय. सुरक्षा हटवण्यात आल्यानं या नेत्यांना पुरवण्यात येणारे सशस्त्र गार्ड कायमस्वरुपी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे ज्येष्ठ नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आली असली तरी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवून ती वाय प्लस करण्यात आलीय. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आलीय. सुरक्षेबाबतच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram