Maharashtra School Reopen : जळगावमध्येही शाळा सुरु, विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि त्याचा प्रदूरभाव वाढू नये या साठी शासनाच्या वतीने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात अतिशय कमी असल्याच लक्षात आल्यावर आणि त्याची तीव्रता कमी असल्याच लक्षात आल्यावर विद्यार्त्याच शैक्षणिक नुकसान होऊ नये या साठी शासनाच्या वतीने शहरी भागातील शाळा वगळता ग्रामीण भागातील शाळा आज पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ज्या गावात कोरोनाची रुग्ण संख्या दहा पेक्षा कमी आहे अशा गावातील शाळा या सुरू करण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारच्या शाळेचा म्हणजेच शिरसोली गावातील बारी समाज माध्यमिक शाळेच्या पहिल्याच दिवसाचा आढावा आमचे प्रतिनिधी चंद्र शेखर नेवे यांनी घेतला असता शाळा प्रवेशा वेळी मोठा उत्साह दिसून आला आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्साह कायम टिकून ठेवण्या साठी शाळा प्रशासन ने ही विद्यार्थ्यांचं ढोल ताशे गजरात आणि पुष्प गुच्य देऊन स्वागत केले आहे या सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी मास्क,स्यनी टायझर,सोशल दिस तंसिंग पालन करून शाळा सुरू केल्या आहेत