School : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, रविवारीही शाळा सुरु ठेवण्याची मुभा
School : कोरोनामुळं शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी एप्रिल महिन्यातही शाळा सुरु राहणार आहेत. शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच रविवारीही शाळा सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकाकडूनही मागणी करण्यात आली होती.