School Reopening : 4 ऑक्टोबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरु, शाळा प्रशासनाकडून तयारी
Continues below advertisement
राज्य सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई आणि ठाणे शहरात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्य़ातील शाळेतील प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. शाळा पूर्णतः सॅनिटाईज करणे, शाळेतील बाक आणि वर्गांची साफसफाई करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच शाळा प्रशासनाने पालकांशी सल्लामसलत करून नवीन नवीन उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे.दादर मधील साने गुरुजी विद्यालयानं सर्व पालकांशी संपर्क साधून ते मुलांना शाळेत पाठवणार आहेत की नाही यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तर ठाण्यातील राबोडी इथल्या सरस्वती विद्यालयात एक मेडिकल रूम सज्ज ठेवण्यात आली आहे.
Continues below advertisement