Dhule : धुळे जिल्ह्यात कोरोना नियम पाळत शाळा सुरू, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण
मार्च 2020 साली देशाला कोरोनाने विळखा घातला आणि शाळा बंद झाल्या. मार्च 2021 मध्ये देश पुन्हा दुसऱ्या लाटेकडे कुच करू लागला आणि शाळा यावर्षीही सुरू झाल्याच नाहीत. परंतू कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारनं 4 ऑक्टोबर पासून काही भागात शाळा सुरू करण्याचे ठरावले. धुळे जिल्ह्यातही वर्षभराने शाळा सुरू झालेल्या व मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीनला कंटाळलेले शिक्षक व विद्यार्थी पून्हा शाळते दाखल झाले आणि अखेर शाळेची घंटा वाजला. धुळे जिल्ह्यात सरकारने जाहीर केलेले सगळे कोरोना नियम पाळुन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत आणि सर्वांनामध्ये उत्साहाचं वातावरण आहे.