Mhada Paper Leak : म्हाडा भरतीचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर, काय होता Code Word?
म्हाडा भरती पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्डचा वापर करण्यात आल्याची नवी माहिती आली आहे. घरातील वस्तू कधी मिळणार? या कोडवर्डद्वारे आरोपींचं संभाषण होत असल्याचं समोर आलंय. घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.