Tribal Development Fraud : अदिवासी विकास विभागाच्या भरती प्रक्रियेत घोटाळा, काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागाच्या भरती प्रक्रिेयेत घोटाळा झाला आहे. जुलै 2014 ते एप्रिल 2016 या काळात राबवण्यात आलेल्या भरतीय प्रक्रियेत घोळ झाल्याचं समोर आलं. आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटी सर्व्हिसेसचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.