Mumbai Jaipur Superfast Express : जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील चौथ्या व्यक्तीची ओळख पटली
Continues below advertisement
जयपुर एक्सप्रेस फायरिंग घटनेतील चौथ्या मृतकाची ओळख पटली आहे. सैयद सैफुदिन असं मृत व्यक्तीचं नाव असून ते हैदराबादचे रहिवासी होते. ते मूळचे कर्नाटकच्या बिदरचे होते, मात्र गेल्या १५ वर्षांपासून ते आपल्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहत होते. अजमेर शरीफहून परतताना त्यांच्यावर जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यातली सर्वात लहानी मुलगी तर अवघ्या सहा महिन्यांची आहे. तिन्ही मुलींना सरकारनं प्रत्येकी २५ लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे.
Continues below advertisement