Sayaji Shinde On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं अभिनेते सयाजी शिंदेंकडून स्वागत
Sayaji Shinde On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भूमिकेचं अभिनेते सयाजी शिंदेंकडून स्वागत
कवी नरेश सक्सेना यांच्या कवितेच्या ओळी वाचून सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हिंदू प्रथा परंपरा यांच्याबाबत बोलताना आधीच्या परंपरांमध्ये कुठेतरी बदल व्हायला हवा असा उल्लेख केला होता यामध्ये प्रामुख्याने बोलताना अंतिम संस्कारासाठी आता लाकडा ऐवजी विद्युत वाहिन्यांचा स्मशानभूमीचा वापर वाढावा अशी प्रतिक्रिया दिली होती. याच भूमिकेला साजेल अशी भूमिका आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील घेतली आहे. कवी नरेश सक्सेना यांच्या कवितेच्या ओळी वाचून त्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक झाड ही उरावे मागे - नरेश सक्सेना अखेरच्या क्षणी जेव्हा कोणीही सोबत जाणार नसेल एक झाड असेल आपल्या पाखरं-खारींना मागे सोडून सोबत जाईल एक झाड आगीत प्रवेश करेल ते माझ्याही आधी किती लाकूड लागेल? स्मशाना जवळचा वखार वाला विचारेल अगदी गरीब इथला गरीब ही सात मण तर घेतोच लिहून ठेवतोय मी शेवटच्या इच्छांमध्ये की विद्युत दाहीनीतच व्हावा माझ्यावर अंतिम संस्कार कारण माझ्यानंतर माझा मुलगा, मुलगी आणि एक झाड ही उरावं मागं या जगात! राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात हिंदू प्रथा परंपरा यांच्याबाबत बोलताना आधीच्या परंपरांमध्ये कुठेतरी बदल व्हायला हवा असा उल्लेख केला होता यामध्ये प्रामुख्याने बोलताना अंतिम संस्कारासाठी आता लाकडा ऐवजी विद्युत दाहिन्यांचा वापर वाढावा अशी प्रतिक्रिया दिली होती. याच भूमिकेला साजेल अशी भूमिका आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील घेतली आहे. कवी नरेश सक्सेना यांच्या कवितेच्या ओळी वाचून त्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.