Satyajeet Tambe vs Nana Patole : काँग्रेसमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; तांबेंचा आरोप, काँग्रेसचे पलटवार
Continues below advertisement
नाशिक पदवीधर निवडणुकीतील गोंधळातून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर समोर आलाय... सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केलेयत... नाना पटोलेंनी एबी फॉर्म चुकीचा दिला, नाशिकची जागा लढणार असताना नागपूर आणि औरंगाबादचा एबी फॉर्म दिला, पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावर बोलणं टाळलं, तर दुसरीकडे लगेच पत्रकार परिषद घेत काँग्रेस अतुल लोंढे यांनी आम्ही सत्यजीत तांबे यांना योग्यच फॉर्म दिला होता... आणि त्याचे फोटो सत्यजीत तांबेंना पाठवल्यानंतर त्यांचं ओके देखील आलं होतं... असा दावा काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय.. दरम्यान आज विजय वडेट्टीवार यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत..
Continues below advertisement