Satyacha Morcha : फॅशन स्ट्रीट ते महापालिकेवर मविआ-मनसेचा मोर्चा
Continues below advertisement
मुंबईत (Mumbai) 'सत्याचा मोर्चा' (Satyacha Morcha), विरोधी पक्षांचा एल्गार. EVM आणि मतदार यादीतील (Voter List) घोळाविरोधात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आले आहेत. 'ज्या पद्धतीनं महाराष्ट्रमध्ये मतचोरी (Vote Theft) झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आमचा पराभव झाला,' असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. या मोर्चाला 'संविधान वाचवा, लोकशाही जगवा' असं नाव देण्यात आलं असून, फॅशन स्ट्रीटपासून (Fashion Street) ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत (BMC) हा मोर्चा निघणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सहभागामुळे काँग्रेस (Congress) पक्ष मात्र अद्याप दूर असल्याचे चित्र आहे, कारण विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रकृतीचे कारण देत अनुपस्थिती दर्शवली आहे. मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाला (Election Commission) मुदतवाढ देण्याची मागणीही करण्यात आली असून, मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement