Voter List Fraud: 'निवडणूक आयोग म्हणजे BJP ची IT Branch आहे का?', मनसे नेत्याचा संतप्त सवाल
Continues below advertisement
मुंबईत मतदार यादीतील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने 'सत्याचा मोर्चा' काढला आहे. या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सहभागी झाले आहेत. 'भारताच्या इतिहासात निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला हा सगळ्यात मोठा मोर्चा असेल,' असा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. MVA आणि MNS नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटवरून निघून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत जाणार आहे, जिथे नेते उपस्थितांना संबोधित करतील. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने या मोर्चाला उत्तर म्हणून मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement