Satish Uke : सतीश उके मुंबईतील ईडी कार्यालयात, चौकशी सुरु ABP Majha
Continues below advertisement
जमीनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आलेले नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांना मुंबईतल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरु आहे... आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे... भाजप नेत्यांवर करण्यात आलेले आरोप आणि याचिका यामुळं सतीश उकेंची राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते.. दरम्यान आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर स्वतः वकील असलेल्या सतीश उकेंचा कोठडीतला मुक्काम वाढणार की त्यांना जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. दरम्यान ईडीनं कायदेशीर बाबींची पूर्तता न करता कारवाई केल्याचा आरोप सतीश उकेंच्या सहकारी वकिलांनी केला आहे..
Continues below advertisement