Lockdown 4.0 | नवीन नियमावलीत दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : गृहराज्यमंत्री सतेज पाटील
Continues below advertisement
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे, असं पाटील म्हणाले.
Continues below advertisement