Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

Continues below advertisement

Satej Patil मुंबई :  काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात गोकुळच्या निवडणुकीत झालेलं राजकारण, मतमोजणी दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून आलेला फोन यासंदर्भात भाष्य केलं. याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार नसल्याची खात्री असल्याचं सतेज पाटील म्हणाले.  

शरद पवार यांचा फोन, काय सल्ला दिलेला?

सतेज पाटील म्हणाले की ज्या दिवशी मतमोजणी होती, आणि मतमोजणीच्या दिवशी ज्यावेळी मतमोजणी पूर्ण होत नव्हती. त्यावेळी  पवारसाहेबांचा चार किंवा पाच वाजता फोन आलेला. मी मोटरसायकलवरुन मतमोजणी केंद्रावर गेलो.कदाचित त्यांना कोणी सांगितलं असेल किंवा बघितलं असेल, त्यांचा फोन आला. पवारसाहेब मला म्हणाले काय चाललंय, मी सांगितलं साहेब जरा गोंधळ चालला आहे. पवारसाहेबांनी मला एकच सूचना केली. मतमोजणी होऊन, सगळा निकाल हातात पडेपर्यंत, सर्टिफिकेट हाती पडेपर्यंत तू मतमोजणी केंद्र सोडू नको. त्यांनी सल्ला काय दिला की मतमोजणी केंद्र सोडू नको.  म्हणलं नाही साहेब मी सगळं झाल्यावरच बाहेर पडेल, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.  
 
सतेज पाटील म्हणाले की, मी अजिबात गाफील नव्हतो, मी पूर्णपणे तयार होतो. राजकारणात एवढी वर्ष आहे, गाफिल राहिलो असतो तर ती अपरिपक्वता ठरली असली असती. विरोधकांना समजून घेणं, त्यातल्या त्यात 15 वर्ष मित्र होते ते काय करु शकतात हे समजून घेतलं नसेल तर मी राजकारणात कच्चा असेल हे म्हणाव लागलं असतं, असं सतेज पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola