Satara | स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा अज्ञातांनी पाडली; शालेय साहित्य उघड्यावर
Continues below advertisement
सातारा : साताऱ्यातील वाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाळा काल अज्ञाताने पाडून शाळेचे संपूर्ण साहित्य बाहेर आणून टाकले. 99 वर्षांच्या करारावर 1956 साली ब्राम्हण समाजाकडून हा वाडा शाळेने घेतला होता. आज या शाळेला सुमारे पन्नास वर्षे झाली. काल संध्याकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांना हा सर्व प्रकार समजला. तर शाळेच्या विद्यार्थ्यांना आज सकाळी अस्ताव्यत झालेली शाळा पहायला मिळाल्यावर विद्यार्थी ढसाढसा रडायला लागले. विद्यार्थी पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यावर पोलिसांनी तक्रार घेतली नाही असे म्हणणे शाळेचे आहे. त्या जागेवर बिल्डरला मोठी वास्तू उभारण्यासाठी हे कृत्य केलं असल्याचे शाळेकडून सांगितले जात आहे. सर्व साहित्य बाहेर काढून शाळा पाडल्यामुळे सर्व विद्यार्थी आज बाहेरच व्हरांड्यात बसले होते.
Continues below advertisement