Satara:राज्यात गारठा वाढला,महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान शून्य अंशावर
Continues below advertisement
राज्यात चांगलाच गारठा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान शून्य अंशावर गेले आहे. वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली असून, महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना देखील या थंडीचा सामना करावा लागतोय. राज्यातल्या अनेक भागात पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेनं राज्यात हुडहुडी भरली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी कायम असून, आज शहरासह परिसरावर धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच नंदूरबारमध्ये देखील पारा चांगलाच घसरला आहे.
Continues below advertisement