Global Pride : साताऱ्याच्या 'राधा' म्हशीची Guinness Book मध्ये नोंद, ठरली जगातली सर्वात बुटकी म्हैस
Continues below advertisement
साताऱ्याच्या (Satara) माण तालुक्यातील 'राधा' म्हशीने (Radha Buffalo) जगातली सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंद केली आहे, तर वाशिम (Washim) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. 'बोगस बियाणं विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर थेट परवाने रद्दची कारवाई करणार,' असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. 'राधा' या म्हशीची उंची केवळ ८३.८ सेंटीमीटर आहे. तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही (India Book of Records) स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, वाशिमच्या बाजारात 'बिजवाई उन्नती' वाणाच्या सोयाबीनला तब्बल ८,४३० रुपये प्रतिक्विंटल इतका विक्रमी दर मिळाला. ही बातमी कळताच यवतमाळ, जालना, हिंगोली, बुलढाणा आणि अकोला येथून मोठ्या संख्येने शेतकरी वाशिममध्ये दाखल झाले. यासोबतच, कोल्हापूर जिल्ह्यातील एका बैलगाडी शर्यतीत (Bailgada Sharyat) विजेत्याला 'फर्च्युनर' गाडी बक्षीस म्हणून मिळाली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement