Satara Rains : कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, पायथा विद्युतगृहातून पाणी सोडणार
साताऱ्यातील कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून पाणी सोडलं जाणार आहे. 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. कोयना धरणात सध्या 35 टीएमसी पाणी साठा आहे. तर धरणात 25 हजारांपेक्षा जास्त क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेसह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड परिसरात मुसळधार पाऊस सुरुच आहे.