Remdesivir Injection | साताऱ्यात शरद पवारांनी गरजूंसाठी दिलेली रेमडेसिवीर इंजेक्शन गायब :राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांचे कोरोनाच्या आजारातून जीव वाचावे यासाठी 175 रेमडेसिवीर इंजेक्शन सातारा जिल्हा रुग्णालयाला दिली होती. या इंजेक्शनमधील काही इंजेक्शन जिल्हा रुग्णालयातून गायब झाल्याचा आरोप सातारा राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.