Satara student hostel : शिरवळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण
abp majha web team
Updated at:
11 Mar 2022 12:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय...बुधवारी रात्री वस्तीगृहात घुसून पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. वसतिगृहातून रात्री मोठ्याने आवाज येतो असं कारण देत पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी परभणी, नागपूर, मुंबई, शिरवळ आणि उदगीर या पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज विद्यार्थ्यांनी बंद पाडलं आहे... तसंच महाविद्यालयांच्या गेटबाहेर आंदोलनही सुरु केलं आहे...