Satara Mandhardevi Yatra : मांढरदेवी गडावर काळूबाईचा जागर, ओमायक्रॉनमुळे गडावर भाविकांना बंदी
abp majha web team
Updated at:
17 Jan 2022 08:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज शाकंभरी पौर्णिमा... महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्याच्या मांढरदेवी गडावर काळूबाईची यात्रा भरते.. मात्र ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलग तिसऱ्या वर्षी काळूबाईची यात्रा रद्द करण्यात आलीय. कोरोनामुळे भाविकांना गडावर येण्यास बंदी घालण्यात आलीय. असं असलं तरी शासकीय अधिकारी आणि ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात आलीय. भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. भाविकांना मांढरदेवी गडावर प्रवेश बंद असला तरी एबीपी माझावर घरबसल्या तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता....