Satara :महाबळेश्वरमध्ये दुसऱ्या दिवशीही पारा घसरला, वेण्णालेक परिसरात दवबिंदू पुन्हा गोठायला सुरुवात
Continues below advertisement
सध्या राज्यात थंडीचा जोर कायम आहे.. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पारा घसरलाय. महाबळेश्वरचं सध्याचं तापमान 7 अंशांवर जाऊन पोहोचलंय. तर वेण्णालेक परिसरात पारा 5 अंशांवर आलाय. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदू पुन्हा गोठायला सुरुवात झालीय. दरम्यान घसरलेल्या तापमानामुळे स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement