Satara : आकाश कंदिलांमध्ये खणाचा ट्रेंड, तरुणीची अनोखी संकल्पना, खणाच्या कंदिलांना मोठी मागणी
सातारा : सध्या जुन्या काळातील अनेक स्टाईल ह्या पुन्हा बाजारात येताना पाहायला मिळत आहेत. यात आपल्या पेहरावाची स्टाईल असेल वा भारतीय संस्कृतीतल्या अनेक वस्तूंची! इतकंच काय, तर आता अनेकजण चुलीवरच्या जेवणाच्या शोधातही असतात. असाच एक जुना पेहराव म्हणजे आजीची खणाची साडी. या साडीच फॅड सध्याच्या महिलावर्गाच्या डोक्यात चांगलच बसलय. प्रत्येक महिला या साड्यांकडे वळत असताना दिसतायत. याचाच आधार घेत काही महिलांनी वापरलेली नामी शक्कल ही बाजारात चांगलाच भाव खाऊन जात आहे.