Satara | भरधाव वेगात जीप चालवून वाहनांचे नुकसान, परदेशी युवतीविरोधात गुन्हा दाखल
सातारा : कराड चिपळून रोडवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक तरुणीने भरधाव वेगात गाडी चालवत वाहनांचे नुकसान केलं आहे. या परदेशी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेची प्रक्रिया करुन तिला आज न्यायालयात हजार करणार आहे. या तरूणीने अंमली पदार्थाच सेवन केल्याची चर्चा आहे. तसेच पोलीस ठाण्यात फक्त अपघाताची नोंद करण्यात आली आहे.