Satara Fake Account Love : सोशल मस्करी, आयुष्याची कुस्करी, मैत्रीणीचा जीव गेला

Continues below advertisement

Satara Fake Account Love : सोशल मस्करी, आयुष्याची कुस्करी, मैत्रीणीचा जीव गेला

इन्स्ट्राग्रामवर फेक अकाऊंट बनवून मैत्रिनीचीच चेष्टा करुन तिला प्रेमात गुरफटवून ठेवले आणि नंतर तो बनावट प्रियकराचा अपघातात मृत्यू झाल्याची त्या बनावट युवकाच्या बनावट बापाने इन्स्टा ग्रामवरुन दिली. आणि हा बनाव प्रियकर आणि प्रियकराचा बनावट बाप तयार केला तो तिच्याच खास मैत्रिनीने. मैत्रीनीची केलेली चेष्टा एवढी महागात पडली की न भेटलेल्या प्रिकराच्या मृत्यूच्या माहितीमुळे युवतीने चक्क गळफास घेऊन आत्महात्याच केली. या प्रकरणात यात चेष्टा करणाऱ्या तिच्या मैत्रीनिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या., ही घटना आहे साताऱ्यातील वाठार येथील. काय आहे नेमक प्रकरण पाहूयात  सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालूक्यातील वाठार येथील रूतूजा दिलीप पवार आणि तिची मैत्रीन गायत्री भोईटे.... या दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकत असताना खास मैत्रीनी होत्या....सख्या असलेल्या दोघींनी एकत्रच ग्रॅज्युशन पुर्ण केले.... मात्र रुतूजाची चेष्टा करण्याचा गायत्रीने निर्णय घेतला आणि इन्स्टाग्रामपवर एका युवकाचे फेक अकाऊंट बनवून रुतूजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले...या फेक अकाऊंट मधिल युवक दिवसेन दिवस तीच्या सोबत चाटिंगवर जास्तच प्रेमाचे बोलत गेला...रुतूजा त्याच्या प्रेमात चांगलीच अडकली होती....गायत्री त्या गोष्टीचा आनंद घेत होती. मात्र रुतूजा जास्तच प्रेमात अडकल्याचे लक्षात आल्यावर गायत्रीने आणखी एक इन्स्टावर अकाऊंट बनवून तीने ते रुतूज्याच्या वडिलांचे असल्याचे दाखवले आणि माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचे रुतूजाला सांगितले. रुतूजाला धक्का बसला. न बोलता न भेटता झालेले हे रुतूजाच्या आयुष्यातील पहिलेच प्रेम होते. तीला तो धक्का सहन झाला नाही आणि तिने घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महात्ये नंतर पोलिसांनी रुतूजाचा फोन चेक केला असता त्या दोन इन्टावरचे अकाऊंट समोर आले. पोलिसांनी सायबरच्या मदतीने माहिती घेतली असता तीची मैत्रीन गायत्री हीच्याच मोबाईल वरुन हे दोन अकाऊंट तयार झाल्याचे समोर आले. आणि पोलिसांनी गायत्रीला ताब्यात घेतल्यावर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांनी गायत्रीला आता बेड्या ठोकल्या असून वाठार पोलिस या प्रकरणाचा आणखी शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram