Shambhuraj Desai Satara Doctor : 'कोणीही असो, त्याला सोडणार नाही', शंभुराज देसाईंचा पोलिसांना इशारा
Continues below advertisement
साताऱ्यातील (Satara) एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Doctor Suicide) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. 'कोणी अधिकारी असला तरी त्याला सोडणार नाही, आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाऊन कठोर कारवाई करू,' असा स्पष्ट इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे. पीडित डॉक्टरने तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) बलात्कार केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. देसाई यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना (SP) स्वतः घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आणि सर्व पुरावे गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. एका सुशिक्षित डॉक्टर महिलेसोबत पोलीस अधिकाऱ्याकडूनच असे कृत्य घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement