Satara Doctor Suicide: 'माझ्या मरणाचे कारण PI गोपाल बदने, ज्याने ४ वेळा रेप केला', सुसाईड नोटमधून खुलासा
Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने (Gopal Badane) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांच्यावर गंभीर आरोप आहेत. 'माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझ्यावर चार वेळा रेप केला', असा उल्लेख पीडित डॉक्टरने तिच्या सुसाईड नोटमध्ये केल्याने खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी राजकीय दबाव होता आणि एका खासदाराचे पीए (PA) वारंवार फोन करून दबाव टाकत असल्याचा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी पोलिसांच्या निलंबनाचे आदेश दिले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. पीडितेला बीडची (Beed) असल्यामुळे पोलिसांकडून टोमणे मारले जात असल्याचा आरोपही चौकशी समितीला दिलेल्या पत्रातून समोर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement