Satara Politics: डॉक्टर मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलं, दानवेंचा निंबाळकरांना खोचक सवाल
Continues below advertisement
साताऱ्यातील (Satara) महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या प्रकरणी बोलताना अंबादास दानवे यांनी, 'मला एक सांगा की या मुलीने आत्महत्या काय मुख्यमंत्री येवू नये म्हणून केली?' असा संतप्त सवाल करत निंबाळकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा रोखण्यासाठी आत्महत्येच्या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप निंबाळकरांनी केला होता. याला उत्तर देताना दानवे यांनी म्हटले की, पीडित मुलीने जून आणि ऑगस्ट महिन्यातच तक्रार पत्र लिहिले होते, त्याचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याशी संबंध जोडणे हे ताळतंत्र सोडून बोलण्यासारखे आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement