Satara Doctor Case : 'SIT नेमल्याची माहिती खोटी आहे', सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पोलीस आणि सरकारविरोधात आंदोलन केले. 'आत्महत्ये प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी (SIT) नेमल्याची माहिती खोटी आहे,' असा थेट आरोप करत सुषमा अंधारेंनी सरकारवर हल्लाबोल चढवला. त्यांनी फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. महिला डॉक्टरविषयीचे आक्षेपार्ह मतं सार्वजनिक डोमेनमधून काढून टाकावेत आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणीही अंधारे यांनी केली आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement